020 26874856 7709155959

Patient Guidelines

मुतखडा पथ्ये

मुतखडा होणे ही प्रवृत्ती आहे तो होऊ नये म्हणून पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.
१) रोज भरपूर पाणी पिणे तासाला १ ग्लास दिवसाला साधारण ५ लिटर
२) खडा पडल्यानंतर किंवा दुर्बिणीने काढल्यानंतर सुद्धा दुसरे मुतखडे होऊ शकतात,
दर ५ ते ६ महिन्यांनी सोनोग्राफी तपासणी करुन घेणे व जपून ठेवणे.
३) पोटात दुखल्यास ताबडतोब केव्हाही अगदी रात्री अपरात्री जास्त दुखल्यास हॉस्पिटलमध्ये ऑडमिट होणे.
४) एकदा मुतखडा झालेल्या रुग्णांना परत मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते.

'हे टाळावे'

पालक, टोमॅटो, आवळा, चिकू, काजू, काकडी, कोलिफ्लोवर, पम्पकीन (भोपळा), मशरूम, वांगी

'हे घ्यावे'

नारळ पाणी, बदाम, मक्याच्या पानांचा चहा, लिंबू, बार्ली, कुळीख डाळ, गाजर, अननस रस, केली, कारली


कोलोनोस्कोपी (Colonoscopy) म्हणजे काय?

कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आताडीची आतून दुर्बिणीने केलेली तपासणी. यामध्ये आतडीच्या आवरणाजवळ जाऊन सूक्ष्मरीतीने डोळ्यांनी तपासता येते. यासाठी आतडी संपूर्ण स्वच्छ असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी डॉक्टर एक औषध प्यायचा सल्ला देतात.

पूर्वनियोजित वेळेत तुम्ही आला असेल तर तपासणीसाठी १५ टे २० मिनिटे व रिपोर्ट तयार होण्यासाठी १० मिनिटे अशी ३० मिनिटे लागतात. या नंतर लगेच खाल्ले तरी चालेल, परंतु तपासणी करताना उपशामक औषधे दिली असल्यास २ तासांपर्यंत येथे थांबावे लागु शकते.

कोलोनोस्कोपी (Colonoscopy) पूर्वी घ्यावयाची काळजी

१) कोलोनोस्कोपीच्या एक दिवस अगोदर फक्त दुपारी जेवण घेणे. रात्री फक्त पातळ पदार्थ (उदा. दूध, पाणी, चहा घेणे). जेवण करू नये. घट्ट अन्न खाऊ नये.
२) त्याच बरोबर रात्री आणि घेणे.
३) कोलोनोस्कॉपीच्या दिवशी सकाळी ५ वा. घेणे. त्याच्या अर्ध्या तासानंतर ५.३०. वा. दीड लिटर पाण्यामध्ये मिसळून १ ते १ १/२ तासात संपवणे.
४) कॉलोनोस्कॉपीला येत्या वेळेस घट्ट अन्न घेऊ नये. (चहा, कॉफी चालेल). सकाळी १० वा. हॉस्पिटल मध्ये येणे.

कोलोनोस्कोपी (Colonoscopy) प्रत्यक्षात कशी होते ?

नोबल हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कॉपी ओ.टी. मध्ये केली जाते. प्रोसिजर रुममध्ये तुम्हाला डाव्या कुशीवर पडून राहण्यास सांगितले जाते. गरज असल्यास हृदयाचे ठोके मॉनिटर करणारी साधणे तुमच्या छातीशी आणि हाताच्या बोटांना लावली जातात. अर्थात त्यामुळे रक्तदाब आणि प्राणवायूची पातळी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे डॉक्टरांना सोपे जाते.

गुदद्वारामार्गे ही तपासणी केली जाते. गुदद्वाराभोवती वेदना घालविणारे क्रीम लावण्यात येते. कोलोनोस्कोप गुदद्वारावाटे मोठ्या आतडीमध्ये जात असताना क्वचित पोटात फुगीरपणा आणि हालचाल झाल्यासारखे जाणवू शकते, म्हणुन रुग्णाने तोंडावाटे सावकाश संथपणे श्वास घेत राहिल्यास काहीही त्रास जाणवत नाही. रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. डॉक्टरांची व रुग्णाची संमती असल्यास नातेवाईक पुर्ण प्रोसिजर टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतात.

सर्वसाधारणपणे निदान करण्याच्या हेतूने केलेल्या एन्डोस्कीपीसाठी उप्शामक औषधे ची गरज फार क्वचित पडते. कृपया हॉस्पिटलमध्ये येताना दागिने किवा मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नये. रुग्णाने कृत्रिम दातांची कवळी, चष्मा, कर्णयंत्र, तपासणीपूर्वी काढून ठेवावे. उपशामक औषधे देण्याची अचानक गरज पडल्यास या गोष्टी नसाव्यात.

रुग्णाला लागणारी स्वत:ची नेहमीची औषधे बरोबर असावीत (उदा. दम्याचा पंप, छातीमध्ये दुखल्यास जिभेखाली ठेवण्यासाठी गोळ्या इ.) आणि याबाबत नर्सिंग स्टाफला सांगणे आवश्यक आहे.
एन्डोस्कोपी पश्च्यात जर कुठला रिपोर्ट करणे निश्चित झाले असेल (उदा. बायोप्सी, रक्त तपासणी इ.) तर त्याचा दिवस व पुन्हा भेटण्याची वेळ निश्चित करुन घ्यावी.

जर तुमच्या कोलोनोस्कोपीला उप्शामक औषधाची गरज पडल्यास ...... बाह्य रूग्णाबरोबर आलेल्या व्यक्तीस ड्रायव्हिंग येत नसेल तर रुग्णास रिक्षा किवा टक्सीने घरी नेऊ शकतात. परंतु भूल दिली असल्यास गाडी स्वतः चालविणे किवा दुचाकी वाहनांवर रुग्णास मागे बसवून घेऊन जाण्यास मनाई आहे.



ESWL माहितीपत्रक व संमती पत्रक

१) ESWL ह्या पध्दतीमध्ये लिथोट्रोपटरच्या कंपनीच्या धक्क्याने मूत्रपिंड, गाविनी(युरेटर) यामधील मूतखडे फुटतात आणि त्याची बारीक रेती होते. ही रेती लाघवीबरोबर वाहून जाते.
२) ESWL ही उपचार पध्दती गरोदर स्रियांनी घेऊ नये. गर्भात ती हानिकारक ठरू शकते. ज्या स्रिया जननक्षम वयोमर्यादित आहेत त्यांना आपली पाळी चुकली असल्यास अथवा गरोदर असल्यास तसे आधी डॉक्टरांना सांगावे.
३) कधी कधी मुतखडयाच बारीक तुकडे लाघवीवाटे गाविनीमधून खाली येत असताना रुग्णास थोडयाफार वेदना होतात. यासाठी योग्य टे औषध दिले जाते. हे तुकडे लवकर निघून जावेत यासाठी भरपूर पाणी व पातळ पदार्थ पिणे इष्ट आहे. दोरीवर उडया मारणे, धावणे, खडबडीत रस्त्यावर दुचाकीवरून जाणे अशा तऱ्हेची हालचाल फायद्याची ठरते.
४) ह्या उपचारानंतर मुत्राचे रंग एक दिवस लालसर होणे शक्य आहे, त्याची काळजी करू नये.
५) मुतखडयाचे सर्व तुकडे शरीराबाहेर पडण्यास एक आठवडा ते बारा आठवडे कालावधी लागणे शक्य आहे.
६) मूतखडे पूर्णपणे बाहेर पडले आहेत त्याची खात्री करुन घेण्यासाठी वेळोवेळी एक्स-रे अथवा सोनोग्राफी करावी लागते, त्याचा खर्च वेगळा येईल.
७) क्वचीतप्रसंगी मुतखडयाचे तुकडे गाविनी(युरेटर) मध्य अडकून बसतात अशावेळी सिस्टोस्कोपी किंवा युरेटोस्कोपी करुन खडे काढावे लागतात त्यासाठी खर्च वेगळा येईल.
८) अगदी क्वचीत प्रसंगी अनेकदा कंपनांचे धक्के देऊनही मुतखडा फुटत नाही मग वेगळ्या पध्दतीने किंवा शस्त्रक्रियेने खडा काढावा लागतो. डॉक्टर यासंबंधीची जरूर ती माहिती देतील.
९) ह्या उपचारांनी मुतखडा निघून गेल्या नंतर पुन्हा नवीन मुतखडा तयार होणे शक्य आहे.
१०) पुन्हा मुतखडा होऊ नये किंवा झाल्यास त्वरित लक्षात यावा यासाठी पाणी व पातळ पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. पोटाचा एक्स-रे व सोनोग्राफी वर्षातून एकदा तरी करुन घ्यावेत. आहार संबंधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



Treatment of Urinary Stones Without Surgery and Anesthesia.. Cashless / Mediclaim facility available for all major TPA / Insurance companies ..